corona virus

कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढला

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.27 :  दोन दिवसापूर्वी कोरोना बाधितांचा आकडा थोडाफार कमी झाला होता. मात्र बुधवारी (दि.28) पुन्हा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढला आहे. जिल्ह्यात 1 हजार 346 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये बीड तालुका सर्वात आघाडीवर आहे.
आरोग्य विभागाला बुधवारी (दि.28) चार हजार 489 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल एक हजार 346 जण बाधित आढळून आले असून 3 हजार 143 जण निगेटिव्ह आले आहेत. या बाधीतांमध्ये बीड तालुका सर्वाधिक आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. बीड-346 अंबाजोगाई 260, आष्टी 54, धारूर 72, गेवराई 131, केज 145, माजलगाव 58, परळी 75, पाटोदा 67, शिरूर 79 आणि वडवणी तालुक्यात 57 रूग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी

Tagged