राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड जिल्हाध्यक्षपदी राजेश्वर चव्हाण यांची नियुक्ती

न्यूज ऑफ द डे बीड

प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते दिले नियुक्तीपत्र

अंबाजोगाई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी राजेश्व चव्हाण यांची नियुक्ती शुक्रवारी (दि.२५) करण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद बदलण्यात येणार असल्याच्या चर्चा होत्या. गत महिन्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आढावा घेतला होता. त्या बैठकीतच जिल्हाध्यक्ष पद बदलण्याचा निर्णय झाला होता. परंतु नूतन जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीची प्रक्रिया बाकी होती. अखेर अंबाजोगाई तालुक्यातील हातोला येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेश्वरराव चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना मुंबई येथे प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

राष्ट्रवादीत मोठे योगदान
राजेश्वरराव चव्हाण यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मोठे योगदान आहे. ते म्हाडाचे संचालक, जिल्हा परिषद सदस्य होते. सध्या अंबाजोगाई तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत.

Tagged