काळजी घेण्याचे आवाहन
बीड : गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा उद्रेक कमी झालेला होता. परंतु पुन्हा एकदा देशभरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा रुग्ण आढळला आहे.
कोरोनामुळे जगभरातील घडी विस्कटली होती. मात्र लसीकरणामुळे कोरोना आटोक्यात आला होता. मात्र पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढू लागला आहे. बीड जिल्ह्यातील केज शहरात तब्बल वर्षभरानंतर एका रुग्णाची नोंद झाल्याचा अहवाल आज समोर आला. केज शहरातील धारूर रोडवरील एक ८६ वर्षीय व्यक्ती हा कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याची नोंद जिल्ह्याच्या दि.2 एप्रिल 2023 च्या कोरोना अहवालामध्ये झालेली आहे. नागरिकांनी लक्षणे दिसताच कोरोना चाचणी करण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.