बहिरवाडीचे सरपंच बाजीराव बोबडे यांचे निधन

बीड

बीड दि.21 :तालुक्यातील बहिरवाडीचे सरपंच बाजीराव भगवानराव बोबडे (वय 48) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. दोन दिवसापुर्वी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान गुरुवारी (दि.21) रात्री त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, दोन मुले, भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर बहिरवाडी येथील शेतात शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

सलग तीन टर्म भूषविले सरपंचपद
बाजीराव बोबडे हे समाजिक व राजकिय क्षेत्रात अनेक वर्षापासून सक्रिय होते. बीड तालुक्यातील बहिरवाडी ग्रामपंचायत गेल्या 15 वर्षांपासून त्यांच्याच ताब्यात आहे. सामान्य माणसांच्या कायम सुखदुःखात उभा राहण्याचा त्यांचा स्वभाव होता. केवळ बहिरवाडीच नाही तर सर्कलसह तालुक्यात त्यांना मानणारा वर्ग होता. त्यांचा मित्रपरिवार व संपर्कही दांडगा होता. त्यांच्या अकाली निधनाने बहिरवाडीसह परिसरात शोककळा पसरली आहे.