bharat latpate

वनक्षेत्रपाल भारत लटपटे यांच्या चौकशीची मागणी

बीड

बीड : येथील सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल भारत लटपटे यांच्याविरोधात अगोदर मजूरांनी आमदारांकडे धाव घेत तक्रार केली होती. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रार करण्यात आली असून चौकशी करण्याची मागणी वृक्षप्रेमी नागरिकांनी केली आहे.

जिल्हा प्रशासनाकडे दिलेल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, बीड तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक वनीकरण विभागामार्फत झालेल्या कामात भ्रष्टाचार झाला आहे. असाच प्रकार यापूर्वीचे वनक्षेत्रपाल यांच्या काळात झाला होता. त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणात कारवाई झाली होती. त्यानंतर तरी भ्रष्टाचार थांबेल असे वाटले होते. परंतू हा प्रकार सुरुच आहे. सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल भारत लटपटे यांनी मजूरांचे वेतन थकविले आहे. आता ते निधी नसल्याचे सांगत असले तरी त्यांनी लाखो रुपये काही ठराविक व्यक्तींच्या नावे वितरित केले आहेत. त्याची यादी जिल्हा प्रशासनाकडे देण्यात येणार असून त्याची निधीसह आतापर्यंत वनविभागाच्या विविध योजनेतून काय फलनिष्पत्ती झाली याचीही चौकशी करावी. याशिवाय वनक्षेत्रपाल लटपटे यांची कार्यपद्धती अत्यंत्य संशयास्पद आहे, त्यांची चौकशी करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. निवेदनावर अ‍ॅड.नारायण सीरसट, के.के.वडमारे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. दरम्यान, याप्रकरणी लटपटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यांच्याविरोधातील तक्रारींबाबत प्रतिक्रिया देण्यास ते टाळाटाळ करत असल्याने त्यांची भुमिका समजू शकली नसली संशयास्पद आहे.

Tagged