corona-death

बीडमध्ये कोरोनाचा दुसरा बळी

बीड

मयत व्यक्तीचा अहवाला पॉझिटिव्ह
बीड : जिल्ह्यात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथील एका महिलेचा यापूर्वी कोरोनाने मृत्यू झाला होता. आज आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्याचा अहवाल काही वेळापूर्वी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयात रविवारी रात्री आष्टी तालुक्यातील मातावळी येथील एका 35 वर्षीय रुग्णाचा स्वॅब तिसर्‍या वेळेस घेण्यात आला होता, मात्र सोमवारी पहाटे या रुग्णाचा अचानक मृत्यू झाला. या रुग्णाचा रिपोर्टही सोमवारी रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाला. त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असून त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे पाटणसांगवीच्या महिलेनंतर हा दुसरा मृत्यू झाला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged