sunil kendekar

केंद्रेकरांनी ‘सीएस’ला प्रचंड झापले; कोरोना वार्डात जाऊन केली पाहणी

कोरोना अपडेट बीड

बीडमध्ये कोरोना चाचणी प्रयोगशाळा होणार तर नियंत्रण अधिकारी म्हणून सीईओंवर जबाबदारी

बीड : कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या रडारवर आरोग्य विभाग असल्याचे दिसून आले. आरोग्य यंत्रणेबाबात त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. तसेच, त्यांनी आरोग्य विभागाबाबत काही महत्वाचे निर्णय घेतले. स्वतः कोविड वार्डात जाऊन रूग्णांशी संवाद साधला. वार्डातून बाहेर पडताच एकही तक्रार नाही, मी सध्या तरी आरोग्य व्यवस्थेवर समाधानी आहे, असं म्हणाले. एकंदरीत केंद्रेकरांनी आरोग्य विभागालाच ‘लस’ दिली असेच म्हणावे लागेल.

माध्यमांच्या प्रतिनिधींकडून आरोग्य विभागाच्या तक्रारी समोर येताच केंद्रेकरांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुर्यकांत गिते यांना बोलावून केंद्रेकरांनी प्रचंड झापले. ते म्हणाले, एक रूग्ण तुमच्या इमारतीवरून उडी मारतो आणि तुम्हाला माहिती होत नाही, असं उत्तर देता. स्वतःसह आरोग्य यंत्रणेला बदला. यापुढे बेजबाबदार उत्तरे देऊ नका. तुमची स्वतःची यंत्रणा उभी करा. मी अचानक जिल्हा रूग्णालयात येईल, डॉक्टर न दिसल्यास थेट गुन्हे दाखल करील. पेशंट बाहेर फिरताना दिसल्या तुम्हाला जबाबदार धरेल. नीट काम करा, पहिलाच अधिकारी बरा होता, असं म्हणण्याची वेळ येत आहे, असे सुनावले. जिल्हाधिकारी जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार या दोघांकडे पाहत जिल्हा शल्य चिकीत्सकांना नीट सांगा, त्यांच्या पाया पडा, कारवाई करा, पण काम करून घ्या, असे वैतागून म्हणाले. तत्पूर्वी आढावा बैठकीत ऑक्सीजन प्लॅटचा आढावा घेत असताना केंद्रेकरांनी क्षमता वाढविण्याची सूचना करताच डॉ.गीते म्हणाले, पूर्वीच्या सीएसने हे केले? असं म्हणताच बावळटसारखी उत्तरे देऊ नका, तुम्ही काय केलं ते आधी सांगा असं म्हणत केंद्रेकर संतापले होते. दरम्यान, कोरोनाची परिस्थिती आणि जिल्हा रूग्णालयांच्या तक्रारी पाहता मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्यावर नियंत्रण अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविली आहे, तसे आदेश काढा असे निर्देश केंद्रेकर यांनी दिले. तसेच, बीडमध्ये प्रस्तावित असलेली कोरोना चाचणी तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. आरटीपीसीआर चाचणीवर भर द्यावा. ऑक्सिजन उपलब्धता असावी. ऑक्सीजनअभावी रूग्ण दगावल्यास जिल्हा शल्य चिकित्सकांवर कठोर कारवाई होईल असेही केेंद्रेकरांनी सुनावले.

Tagged