केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे हत्ये प्रकरणात अंजली दमाणीया सामाजिक कार्यकर्त्या यांना त्यांचे भ्रमणध्वरीवर व्हाईस मेसेसमध्ये बश्वेश्वर कल्याणला तीन डेथ बॉडी सापडल्या आहेत, ती खात्रीलयक माहिती नाही आपण ओपन नाही करायच.. अशा मजकूराची व्हाईस मेसेजची बीड पोलीस दलाने खात्री केली असता असा काहीएक प्रकार घडलेला नाही. ही अफवा असल्याचे पोलिसांनी कळविले आहे. मात्र अफवा पसरविणारा व्यक्ती कोण? त्याने कशामुळे अफवा पसरवली? त्यावर काय कारवाई केली याबाबतही पोलिसांनी अधिक माहिती दिली नाही.
ज्या इसमाने अंजली दमाणिया यांना व्हाईस मेसेज पाठविला त्याने मद्यार्काचे नेशेमध्ये असे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले आहे. तरी नागरिकांना सुचित करण्यात येते की, कृपया अशी कोणतीही माहिती असल्यास आपण प्रथम पोलीसांशी संपर्क करावा आरोपीचे शोध कार्यास अडथळा अथवा जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल अशा प्रकारची माहिती कॉमेंट किंवा व्यतव्य करु नये. काही उपयुक्त माहिती असल्यास बीड पोलीसांना कळवुन तपास कार्यास सहकार्य करावे. असे बीड आवाहन बीड पोलीस दलाच्यावतीने करण्यात आले आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.OkPrivacy policy