golibar

डोंगरकिन्ही बसस्थानकात गोळीबार!

क्राईम न्यूज ऑफ द डे पाटोदा बीड

बीड दि.23 : पाटोदा तालुक्यातील डोंगरीकिन्ही बसस्थानक परिसरात गोळीबार झाल्याची घटना बुधवारी (दि.23) सायंकाळच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी अंमळनेर पोलीसांनी धाव घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही येथील बसस्थानक परिसरामध्ये गोळीबार करण्यात आला. जमीनीच्या वादातून हा गोळीबार केला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याची माहिती मिळताच अंमळनेर पोलीस ठाण्याचे सपोनि. श्यामकुमार डोंगरे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोेलीस पुढील तपास करत असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Tagged