परळीतील साई कुलर फॅक्टरीत आग

क्राईम न्यूज ऑफ द डे परळी बीड

  परळी दि.23 : परळी शहरातील इंडस्ट्रेलियार एरियात कुलरच्या फॅक्टरीस बुधवारी सायंकाळी (दि.23) भीषण आग लागली.
या आगीची एवढी तीव्रता आहे की, फायर ब्रिगेडच्या गाडीला पाचारण करावे लागले. तब्बल एक तासापासून ही आग विझवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आग आटोक्याच्या बाहेर असल्यामुळे या आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अज्ञाप समजु शकले नसून सुनिल सोळंके यांची ही फॅक्ट्री आहे. आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged