death

तरुणाचा संशयास्पद मृत्यू; मृतदेहाशेजारी आढळले पिस्टल!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.8 ः शहरातील स्वराज्यनगर परिसरामध्ये एका तरुणाचा बुधवारी (दि.8) सकाळी मृतदेह आढळून आला. तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मृतदेहाच्या शेजारीच एक पिस्टल आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

अक्षय भांडवले (वय 38 रा.बार्शी नाका, बीड) असे मयताचे नाव आहे. त्याचा मृतदेह स्वराज्यनगर येथील मारुती-सुझूकी शोरुमच्या जवळ आढळून आला. घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केतन राठोड यांनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. भांडवले यांचा मृत्यू कशामुळे झाला हे अस्पष्ट असून शवविच्छेदनाच्या अहावालनंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान मृतदेहाच्या शेजारी पिस्टल आढळून आली. पोलीसांनी पिस्टल जप्त केली असून पिस्टल आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

Tagged