collector jagtap

आजपासून लागू होणार्‍या लॉकडाऊनबाबात बीड जिल्हा प्रशासानाकडून गाईडलाईन जारी

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे

बीड- आज रात्री आठ वाजल्यापासून राज्यभरात लॉकडाऊन राहणार आहे. त्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून गाईडलाईन जारी करण्यात आल्या असून त्यात अत्यंत कडक निर्बंध आहेत. शासकीय कार्यालयातील उपस्थितींसह, खासगी कार्यालयातील उपस्थिती, लग्न समारंभ, सार्वजनिक प्रवाशी वाहतूक, खासगी प्रवाशी वाहतूक, आंतरजिल्हा प्रवास आणि कोरोना चाचण्या या अनुषंगाने नियम कडक करण्यात आले आहेत. मात्र असे असले तरी अत्यावश्यक सेवा (उदा.किराणा व इतर) बाबत या आदेशात काही नव्याने निर्देश नाहीत. त्यामुळे या संदर्भातील यापुर्वीचे आदेश कायम असणार आहेत.

जिल्हाधिकार्‍यांनी जारी केलेले दिशानिर्देश पुढीलप्रमाणे…

Tagged