beed lock down

राज्यात गुरुवारी रात्रीपासून लॉकडाऊन जाहीर

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे

मुंबई, दि. 21 : कोरोना संसर्ग तोडण्यासाठी अखेर ब्रेक द चेन म्हणत राज्यात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या रात्री 8 वाजेपासून लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे. यादरम्यान, राज्यातील जिल्हा अंतर्गत वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारकडून राज्यात 1 मेपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्याअंतर्गत असलेली वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास आता करता येणार नाही.


मुंबईतील लोकल सेवा पुन्हा एकदा अत्यावश्यक सेवा म्हणून चालवली जाणार आहे. सरकारी कर्मचारी, डॉक्टर नर्सेस, अत्यावश्यक सेवा कर्मचारी यांना पास दाखवून रेल्वे नेला प्रवासाला परवानगी दिली आहे. त्यामुळे सर्व सामान्यांना लोकलने प्रवास करता येणार नाही.
लग्न समारंभ सोहळ्यांना फक्त दोन तासांची मर्याद लोकांच्या उपस्थितीत परवागनी देण्यात आली आहे. फक्त 25 जण लग्न सोहळ्याला उपस्थितीत राहू शकता. त्यासाठी केवळ 2 तासांची मुदत देण्यात आली आहे. शिवाय या नियमांचं उल्लंघन करणार्‍यास 50 हजार रुपयांचा दंड देखील आकारला जाणार आहे.

गेल्या दोन दिवसांपासून कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लावावा अशी चर्चा या बैठकीत झाली होती. त्यानुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज याबद्दल निर्णय जाहीर करणार होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय निवडा, असा सल्ला दिला होता. परंतु, राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडाऊनचाा पर्याय निवडण्यात आला आहे. 1 मेपर्यंत राज्यात कडक लॉकडाऊन असणार आहे.

Tagged