जहाज, बोट, पंप, पोकलेन, 4 हायवासह 50 ब्रास वाळू जप्त

केज कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे

जिल्हा खनीकर्म पथकाची केजमध्ये कारवाई

केज : तालुक्यातील सुर्डी शिवारात मांजरा धरणाच्या बॅक वाटरमधून वाळू उपसा करणार्‍या 1 मोठे जहाज, 1 छोटी बोट, 1 पोकलेन, पंप, 4 हायवांसह 50 ब्रास वाळू जप्त करण्यात आली. ही धाडसी कारवाई जिल्हा खनीकर्म अधिकारी यांच्या भरारी पथकाने बुधवारी दुपारी केज तालुक्यातील सुर्डी शिवारात करण्यात आली.

  तालुक्यात वाळूमाफियांनी हैदोस मांडला होता. परंतू, त्यांच्या विरोधात कोणताही अधिकारी कारवाई करण्यासाठी धजावत नव्हता. परंतू, प्रभारी जिल्हा खनिकर्म अधिकारी तथा नायब तहसीलदार तुळशीराम आरसूळ यांच्या पथकाने सुर्डी शिवारातील मांजरा धरणाच्या बॅक वॉटरमधून पंपाच्या मदतीने वाळू उपसा करणार्‍या ूमाफियांना विविध साधन सामुग्रीसह रंगेहाथ पकडले. या कारवाईत माजलगावच्या तहसीलदार वैशाली पाटील, अव्वल कारकून हर्षद कांबळे, नितीन जोगदंड, संदीप खुरूद यांच्या पथकाने केली. दरम्यान, यापुर्वी वाळूमाफियांच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत जाऊनही धाड पाकण्याचे धाडस कोण्याही अधिकार्‍यांनी दाखवले नव्हते. त्यामुळे या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
सुर्डीपाठोपाठ अन्य ठिकाणीही कारवाई
सुर्डी शिवारातील पहिली कारवाई करून पथक केजकडे जात असताना रस्त्याच्या बाजुलाच 1 पोकलेन विना परवाना मुरुमाचे उत्खनन करत होते. तर 4 हायवा भरत असताना खनिकर्म अधिकारी तुळशीराम अर्सूळ यांच्या पथकाच्या निदर्शनास आले. चौकशी केली असता कसलाही परवाना त्यांच्याकडे आढळून आला नाही. त्यामुळे 1 पोकलेन व 4 हायवा टिप्परही जप्त करण्यात आले.

Tagged