navneet rana kour

खासदार नवनीत राणा यांची प्रकृती बिघडली

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

अमरावती, दि.13 : मागील आठवड्यात खासदार नवनीत राणा यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर खा.राणा याही पॉझिटिव्ह आढळून आल्या. त्यांच्यावर नागपुरच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र आता त्यांची प्रकृती बिघडली असून त्यांना तातडीने उपचारासाठी मुंबईल हलविण्यात आले आहे. विमानाची व्यवस्था होण्यास वेळ लागत असल्याने राणा यांना बायरोड मुंबईला घेऊन जाण्यात येत आहे.

6 ऑगस्ट रोजी राणा करोनाची लागण झाल्याचं निदान झालं होतं. त्यामुळे त्यांना घरीच क्वॉरंटाइन करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र, त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना 11 ऑगस्ट रोजी नागपूरच्या वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, आज त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यांना श्वास घेण्यासही त्रास होऊ लागल्याने मुंबईला हलवण्यात येत आहे. त्यांना मुंबईत आणण्यासाठी विमानाची व्यवस्था करण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्याला वेळ लागणार असल्याने तातडीने त्यांना बाय रोड मुंबईत आणण्यात येत आहे. चारच्या सुमारास नवनीत राणा यांनी नागपूर सोडले आहे. त्यांच्यासोबत त्यांचे पती, आमदार रवी राणा आहेत. नवनीत राणा यांना मुंबईत लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. रवी राणा यांच्यासह त्यांची दोन्ही मुले, सासू-सासर्‍यांसह कुटुंबातील 12 जणांना करोनाची लागण झाली आहे. या सर्वांवर उपाचार सुरू आहेत. नवनीत राणा यांच्या सासू-सासर्‍यांवरही वोकहार्ट रुग्णालयात उपचार सुरू असून मुलांवर घरीच अमरावतीला उपचार सुरू आहेत.
नवनीत राणा या खासदार असल्याने त्यांना मतदारसंघात फिरावे लागते. करोनाचं संकट असल्याने करोना परिस्थितीचा आढावा घेतानाच विभागांमध्ये जाऊन परिस्थितीची माहिती घेण्याचं काम त्या करत होत्या. शिवाय त्यांनी मतदारसंघात स्वत: धूर फवारणी केली होती. सतत कार्यकर्ते आणि मतदारांच्या त्या संपर्कात होत्या. त्यामुळेच त्यांना करोनाची लागण झाली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.