RUPALI CHAKANKAR

प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे तर महिला प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती

बीड

जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना पत्र

अजित पवारांचे सेम एकनाथ शिंदेच्या EKNATH SHINDE पावलावर पाऊल


प्रतिनिधी । मुंबई
दि.3 : एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रमाणे निवडणूक आयोगाच्या जिवावर पक्ष पळविला अगदी तोच कित्ता अजित पवार यांनी देखील गिरवला. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे आम्ही (अजित पवार गट) AJIT PAWAR आहोत. त्यांनी (जयंत पाटील) JAYANT PATIL पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून त्यांना पदावरून दूर करीत आज पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे SUNIL TATKARE तर महिला प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर RUPALI CHAKANKAR यांची नियुक्ती केल्याची माहिती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल PRAFULL PATEL यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, मंत्री धनंजय मुंडे यांची उपस्थिती होती.



राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजित पवार यांची गटनेतेपदी निवड केली असून अनिल भाईदास पाटील हे प्रतोद असतील, असंही प्रफुल पटेल यांनी सांगितलंय. दुसरीकडे कुणावरही अपात्रतेची कारवाई पक्षाद्वारे होऊ शकत नाही. विधानसभेच्या अध्यक्षांकडे हेह प्रकरण जातं. त्याची लांबलचक प्रोसेस असते, असं सांगायला देखील प्रफुल पटेल विसरले नाहीत.

अजित पवार आणि त्यांना साथ दिलेला आमदारांवर पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी कारवाईची नोटीस राष्ट्रवादीने पाठवल्यानंतर अजित पवार यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेला स्वतः अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी संबोधित केलं. या पत्रकार परिषदेतून शरद पवार आणि त्यांच्या सहकार्‍यांना इशारा देताना कुठल्याही नेत्यावर तुम्ही कारवाई करू शकत नाही किंवा कुठल्याही नियुक्त्या तुम्ही करू शकत नाही, आम्ही म्हणजेच पक्ष आहोत हे देखील अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं.


बहुसंख्या आमदार माझ्यासोबत आहेत म्हणूनच मी उपमुख्यमंत्री झालो आहे. माझ्या निर्णयाला राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांचा पाठिंबा आहे. पक्ष चिन्ह आणि पक्षनाव याच्यावर वाद न घालण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंतु आमच्या आमदारांना कोणी घाबरवू नये. रात्री 12 वाजता प्रेस घेऊन काहीतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय, असं अजित पवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना उद्देशून वक्तव्य केलं.