suicide

गळफास घेवून युवकाची आत्महत्या

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड : तालुक्यातील वरवटी येथील एका युवकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.30) सकाळी 8 च्या सुमारास घडली.

या युवकाने आत्महत्या करण्यापुर्वी आपल्या मोबाईलवर ‘सगळे म्हणतात की आत्महत्या केल्याने समस्या दूर होत नाहीत पण जो आत्महत्या करतो फक्त त्यालाच माहीत असत की काय असे कारण होते’ असे स्टेटस ठेवले होते.

एकनाथ भीमराव साळुंके (वय 22 रा.वरवटी ता.बीड) असे मयताचे नाव आहे. त्याने कुरन वरवटी परिसरातील शेतात बिबव्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजु शकले नाही. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोह.जाधव हे करत आहेत.

Tagged