बीडचा जवान सिक्कीममध्ये बेपत्ता, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कुटुंबियांना संपर्क करून दिला धीर

बीड

मुंबई – सिक्कीम मध्ये मंगळवारी पहाटे झालेल्या ढगफुटी मध्ये बीड जिल्ह्यातील पांडुरंग तावरे हे देश सेवेसाठी तैनात असलेले जवान मागील तीन दिवसांपासून बेपत्ता असून त्यांच्याबद्दल सलामतीची माहिती मिळण्यासाठी हैराण असलेल्या कुटुंबीयांना आज जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी संपर्क करून धीर दिला आहे.

सदर जवानाची माहिती तातडीने मिळावी व त्यांचा शोध घेऊन त्याची माहिती कुटुंबीयांपर्यंत तातडीने पोहोचवली जावी याबाबत धनंजय मुंडे यांनी बीडचे जिल्हाधिकारी ते दिल्लीपर्यंत यंत्रणांना दूरध्वनी द्वारे सूचना करून जवान पांडुरंग तावरे यांच्या शोधासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

धनंजय मुंडे यांनी बीड येथे राहत असलेल्या पांडुरंग तावरे यांच्या पत्नी व अन्य कुटुंबियांशी दूरध्वनीवरून संपर्क करत त्यांना धीर दिला. पांडुरंग तावरे हे गेले 14 वर्ष देशसेवेत असून, ते कर्तव्यावर गंगटोक (सिक्कीम) येथे तैनात होते.