‘आप’ चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

बीड

बीड: आम आदमी पार्टीचे राज्यसभेचे खासदार यांच्या घरावर (दि.4) रोजी छापा टाकत त्यांना इडीने त्यांना अटक केली. या अटकेच्या निषेधार्थ गुरुवार (दि.5) ऑक्टोबर रोजी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम आदमी पार्टीच्या वतीने निर्देशने करण्यात आले.

देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारने अघोषित आणीबाणी चालू केली असून सरकारच्या विरोधामध्ये जर कोणी विधानसभेत राज्यसभेत बोलले तर त्यांच्यावर केंद्रीय एजन्सीचा दुरुप करून कारवाई करत असल्याचा आरोप यावेळी आम आदमी पार्टी बीड जिल्ह्याच्या वतीने करण्यात आला यावेळी आपल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत मोदी सरकारचा निषेध केला. यावेळी आपच्या वतिने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात आपचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, जिल्हा सचिव रामदास जमाले,

सय्यद सादिक, समाजसेविका किश्किंदा पांचाळ, भिमराव कुठे, ,पठाण रफिक, प्रवीण नेहरकर, दादासाहेब सोनवणे, प्रवीण अवसरमल, फैजान खान, रामेश्वर गव्हाणे, सय्यद राजू गुलाब इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.