बीड दि. 4 : जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण खूपच वाढले आहे. कृषी दुकानातील सँम्पल न घेण्यासाठी व वर्षभर सहकार्य करण्यासाठी पाटोदा पंचायत समितीतील विस्तार अधिकारी (कृषी) यास 10 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई उस्मानाबाद एसीबीच्या टीमने केली.
जयेश मुकुंद भुतपल्ले (वय 36, विस्तार अधिकारी (कृषी), पंचायत समिती,पाटोदा असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार यांचे कृषी सेवा केंद्र दुकानातील औषधांचे सॅम्पल न घेण्यासाठी व वर्षभराच्या सीजनमध्ये कारवाई न करता सहकार्य करण्यासाठी आरोपी भुतपल्ले यांनी 6 सप्टेंबर 2023 रोजी पंचांसमक्ष 10 हजार रुपये लाचेची मागणी केली. बुधवारी (दि.4) 10 हजाराची लाच पंचांसमक्ष स्वतः स्वीकारली. याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपतचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, उस्मानाबादचे उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे, सापळा अधिकारी नानासाहेब कदम, अंमलदार विशाल डोके, विष्णू बेळे, सिद्धेशर तावस्कर,अविनाश आचार्य, दत्तात्रेय करडे यांनी केली.