MURDER

बीड तालुक्यात पोलीस पाटलाचा खून!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड : दि.24 बीड तालुक्यातील ढेकणमोहा फाट्यावर पोलीस पाटलाचा डोक्यात खोरे घालून खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी (दि.24) रात्री 10 च्या सुमारास घडली. घटनास्थळी पिंपळनेर पोलीसांनी धाव घेतली असून पुढील तपास करत आहेत.
भिमराव ससाणे (वय 50 रा.मानखुरवाडी ता.जि.बीड ह.मु.ढेकणमोहा) असे मयताचे नाव आहे. ते पोलीस पाटील आहेत. ढेकणमोहा फाट्यावर त्यांच्या डोक्यात खोर्‍याने वार करत त्यांचा खून करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सपोनि.मुस्ताफा शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास करत आहेत.

Tagged