rakhechi wahtuk parali

परळीत राखेच्या वाहतुकीने नागरिक त्रस्त

न्यूज ऑफ द डे परळी

स्थानिक प्रशासन गप्प

परळी : परळीत सध्या राखेच्या वाहतुकीचा धुमाकूळ सुरु असून स्थानिकचे प्रशासन यावर कसलीच कारवाई करायला तयार नाहीत. दिवसभरात शेकडो हायवा नियमबाह्यपणे राखेची वाहतूक करीत आहेत. दुचाकीवरील नागरिक, पादचारी यांना या वाहतुकीचा मोठा त्रास होत आहे.

या बातमीच्या जेपीजी इमेजसाठी इथे क्लिक करा

या पूर्वीसुद्धा या राखेचा प्रश्न चव्हाट्यावर आला होता. त्यावर उपाय म्हणून उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक यांनी राखेची वाहतूक रात्री करण्यात यावी तसेच राख वाहतूक करतांना राख ओली असावी. जेणेकरून उडणार्‍या राखेचा त्रास नागरिकांना होणार नाही याची खबरदारी घेत वाहतूक करावी अशा सुचना वाहतूकदारांना दिल्या होत्या. मात्र या सूचनांचीच वाहतूकदारांनी ‘राख’ केली आहे. राख माफिया भर दिवसा राख उडवीत रस्त्याने राखेची वाहतूक करीत असून सामान्य जनतेला हा त्रास आता असह्य झाला आहे.

परळीतीळ इटके कॉर्नर जवळ राखेने भरून जाणारा हायवा रस्त्यात राख सांडत गेला. यामुळे परिसरात धुक्याचे स्वरूप आले होते. ये-जा करणार्‍या वाहनांमुळे ती राख वातावरणात उडत असल्यामुळे परिसरात कोंडी निर्माण झाली होती. सांडलेली राख हटवण्यासाठी नगरपालिकेच्या अग्निशामक गाडीला पाचारण करण्यात आले होते आणि पाण्याच्या फोर्स ने ती सांडलेले राख धुवावी लागली. मात्र हे प्रकार नित्याचे असून अग्निशामक दल किती दिवस ही राख धुणार? धुवून रस्त्याच्या बाजुला केलेली राख वाळल्यानंतर पुन्हा हवेत उडणारच आहे. यावर एकच पर्याय तो म्हणजे राख सांडू नये म्हणून त्याची ओव्हरलोडींग वाहतूक करू नये.

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged