जाणून घेण्यासाठी क्लिक करा
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या ओबीसी आरक्षणासंदर्भातली सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर पडली आहे.
राज्यात नगरपंचायत निवडणुका सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्याने निवडणुका होणार की नाही? यावरून पेच निर्माण झाला होता. सर्वांचेच लक्ष लागून असलेली सुनावणी लांबणीवर पडली असून उद्या दुपारी 2 वाजता होणार असल्याची माहिती आहे. आज कामकाजाच्या यादीनुसार वेळेत काम पूर्ण होऊ न शकल्याने आता उद्या सुनावणी होईल. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांच्या याचिका कोर्ट एकत्रित ऐकणार असल्याचे सांगण्यात आले आहे.