पतीच निघाला पत्नीचा खूनी, पाच वर्षानंतर गुन्हा उघडकीस

अंबाजोगाई क्राईम बीड मराठवाडा

स्थानिक गुन्हे शाखेची कौतूकास्पद कामगिरी

बीड : पाच वर्षापुर्वी एका विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर नातेवाईकांच्या जवाबावरुन आकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली. पंरतू शवविच्छेदानानंतर गळा दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा अहवाल आला. त्यावरुन अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आठवडाभरापुर्वी हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. तब्बल पाच वर्षापुर्वी घडलेल्या घडनेत पतीच मारेकरी असल्याचे तपासात पुढे आले. आरोपी पतीला अटक केली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या या कामगिरीचे कौतूक होत आहे. 

     दि.17 नोव्हेंबर 2015 रोजी अशोक मन्मथ आकुसकर यांच्या खबरीवरुन मिरा लिंगमुर्ती आकुसकर (वय 32 रा.कोळकानडी ता.अंबाजोगाई) कर्जबाजारीपणाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दिली. यावरुन नातेवाईकांच्या जवाबावरुन अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली असता मयत महिलेची गळा दाबून मृत्यू असा अभिप्राय डॉक्टरांनी दिला. त्यानंतर पोलीस अधीक्षक यांचे आदेशाने सरकारी फिर्यादी होवून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने अंबाजोगाई ग्रामीण सपोनि.श्रीनिवास विष्णुदास सावंत यांच्या फिर्यादवरुन गुरनं. 198/2020 कलम 302, 201 भा.दं.वि.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास पोनि.राऊत करत होते. दि.3 जुलै 2020 रोजीचे पोलीस अधीक्षक यांनी अंबाजोगाई विभागाचे पोलीस अधिकारी यांचे गुन्हे बैठकीचे वेळी अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई यांनी वरील गुन्ह्या संबंधाने चर्चा केली असता पोलीस अधीक्षक यांनी सदर गुन्हयाचे तपासात पो.नि.स्था.गु.शा., बीड यांना गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने सुचना दिल्या. दि.8 जुलै 2020 रोजी स्थानिक गुन्हे शाखेने अंबाजोगाई येथे जावून गुन्हयाचे कागदपत्रांची पाहाणी करुन साक्षीदारांकडे सखोल चौकशी केली. सदरचा गुन्हा यातील मयत मिराबाई लिंगमुती आकुसकर हिचे पती नामे लिंगमुर्ती गंगाराम आकुसकर यानेच केल्याचा संशय बळावल्याने त्यास विश्वासात घेवून गुन्हयाबावत विचारपुस केली असता त्याने त्याचे पत्नीचे चारित्र्यावर संशय घेवून व घरात नेहमी होणार्‍या किरकोळ भांडणावरुन त्याची पत्नी मयत मिराबाईला दिनांक 16 नोव्हेंबर 2015 रोजी रात्री दहाच्या सुमारास प्रा.भोसले यांचे शेतातील विहीरीजवळ नेवून मारहाण करुन तिचा गळा दाबून खुन करुन प्रेत विहीरीत टाकून दिल्याची कबुली दिली. त्यास अटक केली असून ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोदार, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक राहूल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.भारत राऊत, पोनि.महादेव राऊत, पोउपनि बी.जी. केंद्रे, पोउपनि.संतोष जोंधळे, बालाजी दराडे, मुंजाबा कुव्हारे, श्रीमंत उबाळे, जगदीश पांडे, प्रदीप सुरवसे, अलीम शेख वाहन चालक मुकुंद सुस्कर पो.स्टे.अंबाजोगाई प्रा.चे पोलीस कर्मचारी संजय गुंड, नागरगोजे, सय्यद, डापकर, नाना राऊत यांनी केलेली आहे.

Tagged