पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक सुरु!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


बीड दि.17 : गुटखा, मटका, अवैध पिस्टल, अवैध वाळू यासह अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी पुन्हा पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. या पथकाचे प्रमुख म्हणून सहायक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांची गुरुवारी (दि.17) नियुक्ती करण्यात आली आहे.

ganesh munde

गणेश अर्जुन मुंडे (api ganesh munde) यांची स्थानिक गुन्हे शाखेत सहायक पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक होती. सहायक निरीक्षक विलास हजारे यांची नेकनूर ठाण्यात बदली झाल्यानंतर विशेष पथक बंद करण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी गणेश मुंडे यांची या पथकाचे प्रमुख म्हणून नियुक्ती आदेश पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी काढले. तसेच पोलीस अधीक्षकांना अवैध धंद्यांबाबत मिळालेल्या गोपणीय माहितीवरुन हे पथक कारवाया करणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाया करण्याचे गणेश मुंडेंसमोर आव्हान असणार आहे.

(beed sp scaud team)

Tagged