acb trap

शिवाजीनगर पोलीसांची लाचखोरी चव्हाट्यावर; फौजदार जाळ्यात!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.22 : येथील शिवाजीनगर पोलीस ठाणे कायम चर्चेत असते. बसस्थानकातील तडजोडीसह इतरही गुन्ह्यात मोठ्या प्रमाणावर तडजोडी होत असल्याचे वारंवार समोर येत आहे. वर्षभरात चार पेक्षा अधिकजण एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. मात्र तरीही येथील ठाणेदारावर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचा विश्वास ठाम असल्याचे दिसत आहे.

मंगळवारी (दि.22) पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने व कर्मचारी रणजीत पवार या दोघांना गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी 28 हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या कारवाईने जिल्हा पोलीस दलात खळबळ माजली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गुलाब बाचेवाड, युनूस शेख, सुरेश सांगळे, श्रीराम गिराम, अविनाश गवळी, संतोष राठोड, भारत गारदे, अमोल खरसाडे यांनी केली.

Tagged