acb trap

गेवराईमध्ये 70 हजार घेताना लाचखोर एसीबीच्या जाळ्यात!

क्राईम गेवराई न्यूज ऑफ द डे


बीड दि.24 : शिवाजीनगर पोलीस ठाण्यात उपनिरीक्षकासह हवालदारास एसीबीने लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. ही घटना ताजी असतानाच बीड एसीबीने आज गुरुवारी (दि.24) गेवराई येथे कारवाई केली आहे. यावेळी एका लिपिकाला 70 हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. या कारवाईने गेवराईत खळबळ माजली आहे.

राजाभाऊ रामभाऊ शिंदे (वय 52, रा.गेवराई) असे लाचखोर आरोपीचे नाव आहे. शिंदे हे शिक्षक सहकारी पतसंस्थेत वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार यांची पत्नी व इतर महिलांचे नावे संत रोहिदास महाराज महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित खळेगाव ता.गेवराई जि.बीड या नावाने पतसंस्था स्थापन करण्यासाठी संस्थेस नावास मान्यता व श्री.छत्रपती राजर्षी शाहू नागरी सहकारी बँक गेवराई येथे खाते उघडण्यासाठी सहायक निबंधक सहकारी संस्था गेवराई येथून परवानगी हवी होती. ही मिळवून देण्यासाठी शिंदेने 75 हजारांच्या लाचेची मागणी केली. तडजोड अंती 70 हजार रुपये स्विकारण्याचे मान्य करत गेवराईत पंचासमक्ष लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी गेवराई पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शेख युनूस, भरत गारदे, अमोल खरसाडे, अविनाश गवळी, गणेश मेहेत्रे यांनी केली.

Tagged