बीडमध्ये एसपी ऑफिसमोर घेतात मटका; विशेष पथकाची कारवाई!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


मालकासह पाच जणांवर गुन्हा दाखल
बीड दि.28 ः येथील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मटका घेत असल्याचे समोर आले आहे. पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने सोमवारी (दि.28) धाड टाकत चौघांना पकडले. त्यांच्याकडून रोख रक्कम असा सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष पथकाने टाकलेल्या धाडीत सागर चांगदेव भोसले (रा.गोविंदनगर, बीड), मोमीन माजेद मोमीन खाजा (रा.राजुनगर, बीड), दादासाहेब रामभाऊ माने (रा.केतुरा, बीड), आसरार मोहमद खान दोस्त मोहमद खान (रा.राजुनगर धानोरा रोड), सुलतान खान सादात खान (रा. खाजीनगर बालेपीर, बीड) हे स्वतःच्या फायद्यासाठी कल्याण नावाचा मटका खेळवित असताना आढळून आले. त्यांच्याकडून रोख 18 हजार 100 रुपये, एक दुचाकी, आठ मोबाईल असा 1 लाख 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वरील आरोपीसह बुकीमालक नितीन खोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख गणेश मुंडे यांनी केली.


शिवाजीनगर पोलीसांनी किमान
एसपी साहेबांची तरी ठेवावी

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या थेट समोरा-समोर हाकेच्या अंतरावर मटका घेतला जातो. यावर विशेष पथक कार्यन्वित होताच कारवाई करते, मात्र शिवाजीनगर पोलीसांची हद्द असून त्यांना या अवैध धंद्यांबाबत कधीही माहिती नसल्याचे त्यांच्याकडून न होणार्‍या कारवायावरुन दिसते. जर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच मटका घेतला जात असेल तर ठाणे हद्दीत इतरत्र काय परिस्थिती असेल याचा अंदाज पोलीस अधीक्षकांनीच लावलेला बरा.

Tagged