दिवसा कार्यालयात न दिसणारे एआरटीओ रात्री फिरु लागले!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


त्यात स्कार्पिओने गाडीला दिली धडक ; गेवराई पोलीसात गुन्हा नोंद
बीड
दि.28 : येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात कधी न दिसणारे एआरटीओ मात्र रात्रीच्या वेळी अवैध वाहतूक व अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी रात्रीच्या वेळी फिरु लागले आहेत. ही बाब त्यांच्या शासकिय वाहनाला दिलेल्या धडकेमुळे उघडकीस आली आहे. चालकाच्या फिर्यादीवरुन स्कार्पिओच्या चालकाविरोधात गेवराई पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
चालक संतोष बिभीषन मांजरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 27 जुलै रोजी रात्री साडेसातच्या सुमारास एआरटीओ संदीप खडसे, मोटार वाहन निरीक्षक रवीकिरण भड आम्ही अवैध वाहतूक व अवैध वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई करण्यासाठी शासकिय वाहनाने (एमएच-04- इपी-0909) बीड येथील कार्यालयातून खामगाव फाटा येथे गेलोत. यावेळी एआरटीओ खडे व भड यांनी आदेशीत केले की, तुम्ही बीडला जा आम्ही येथेच थांबून कार्यवाही करणार आहोत. त्यानंतर बीडकडे येत असताना गेवराई बायपास रोडवरील दत्तराज हॉटेल येथे अचानकपणे काळ्या रंगाची स्कार्पिओने (एमएच-23 बीसी-0051) उजव्या चाकाला धडक दिली. यामुळे गाडीचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी स्कार्पिओ चालकाविरोधात भरधाव वेगात, हायगई व निष्काळजीपणाने वाहन चालून धडक दिली. या प्रकरणी गेवराई पोलीसात अज्ञात चालकावर कलम 279, 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वाळूच्या कारवाईतच सगळ्यांचा इंट्रेस
येथील आरटीओ कार्यालयामध्ये अनेकांची कामे होत नाहीत. येथे नेहमी दलालांचा सुळसुळाट असतो. त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना अर्थिक भूर्दंड बसतो, व वेळेवर कामे होत नाहीत. सकाळी 12 ते 1 पर्यंत एकही अधिकारी, कर्मचारी हजर नसतो. वाळू हा विषय सर्वात आगोदर महसूलचा आहे. पण पोलीस बांधवांचाही यामध्ये मोठा इंट्रेस असतो. त्यात आता सोबतील एआरटीओ साहेब आले आहेत. त्यांनी कारवाई केल्यास स्वागतच आहे, पण आरटीओ कार्यालयातील कामांनाही थोडा वेळ द्यावा अशी मागणी होत आहे.

Tagged