Corona

बीड जिल्ह्यात तिसऱ्या लाटेचे संकेत; कोरोना रुग्णसंख्या अडीचशेच्या जवळ

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

५ हजार नमुन्यात अडीचशेच्या जवळ बाधित

बीड : जिल्ह्यात बुधवारी (दि.२८) कोरोनाचा आकडा वाढला असून अडीचशेच्या जवळ गेल्याने चिंता वाढली आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येने दुसरी लाट लाट न थांबताच थेट तिसरी लाट येण्याचे संकेत दिले आहेत.

मंगळवारी ५००९ जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.२८) प्राप्त झाले, त्यामध्ये २४१ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ४७६८ नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात ५०, अंबाजोगाई ५, आष्टी ४४, धारूर १६, गेवराई २९, केज १०, माजलगाव ५, परळी १, पाटोदा ३३, शिरूर ३९, वडवणी ९ असे रुग्ण आढळून आले. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.

Tagged