ACB TRAP

खाजगी इसमासह वरिष्ठ तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात!

क्राईम न्यूज ऑफ द डे परळी बीड


बीड : दि.06 : तक्रारदाराच्या सासऱ्याचे जळालेले मीटर बदलून देण्यासाठी महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञसाठी खाजगी इसमाने शुक्रवारी (दि.6) दुपारी 20 हजाराची लाच स्वीकारली. या प्रकरणी दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल ज्ञानोबा नागरगोजे (वय 29, नोकरी, वरिष्ठ तंत्रज्ञ, शहर पथक क्र 1, म.रा.वि.नि.कंपनी. परळी) व खाजगी इसम वृक्षराज लक्ष्मण काळे (वय 35 रा.टोकवाडी, ता. परळी) अशी लाचखोरांची नावे आहेत. तक्रारदार यांचे सासऱ्याचे नावे असलेले घरगुती विद्युत मीटर जळल्याने सदरचे मीटर बदलून नवीन मीटर बसवून दिल्याचा मोबदला, व यापुढे जास्त बिल येऊ न देण्यासाठी नागरगोजे याने लाचेची मागणी करून पंचासमक्ष लाच रक्कम स्वीकारून लाच रक्कम खाजगी व्यक्तीकडे दिली. ही रक्कम खाजगी व्यक्तीने स्वतःपंच साक्षीदार समक्ष स्वीकारली असता लाच रकमेसह रंगेहाथ पकडले आहे. हे कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाध्यक्ष शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अमोल धस, निरीक्षक रविंद्र परदेशी, पोलीस अंमलदार भारत गारदे, अविनाश गवळी, श्रीराम गिराम, चालक गणेश म्हेत्रे यांनी केली.

Tagged