bachhu kadu

रस्ता ओलांडताना बच्चू कडू यांना भरधाव दुचाकीची धडक!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र


खाजगी रुग्णालयात उपचार सुरु
बीड
दि.11 : प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू यांना रस्ता ओलांडताना भरधाव असलेल्या दुचाकीने जोराची धडक दिली. या अपघातात बच्चू कडू हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अमरावती येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मागील काही दिवसांपासून राज्यातील आमदारांच्या अपघाताची मालिकाच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार जयकुमार गोरे, आमदार धनंजय मुंडे, आमदार योगेश कदम यांच्या कारचा अपघात झाला होता. बुधवारी (दि.11) सकाळी अमरावतीत सहा ते साडेसहाच्या दरम्यान बच्चू कडू रस्ता ओलांडत होते. तेव्हा एका दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. या दुचाकीच्या धडकेत बच्चू कडू हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अमरावतीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून, डोक्याला, हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. तसेच, बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Tagged