आमदार बच्चू कडू यांच्या गाडीला अपघात

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

अमरावती शहरातील घटना; डोक्याला मार

अचलपूर : विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा रस्ता क्रॉस करताना मोठा अपघात झाला आहे. यांच्या डोक्याला मार लागला आहे. बच्चू कडू यांना एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. यात ते जखमी झाले असून त्यांना तात्काळ अमरावतीच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आमदार बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला मोठ्या प्रमाणात इजा झाल्याची माहिती आहे. त्यांच्या डोक्याला चार टाके पडले असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. अमरावती शहरात सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान रस्ता ओलांडताना एका दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. या दुचाकीच्या धडकेत बच्चू कडू रोडच्या दुभाजकावर जोरदार आदळल्याने डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागल्याची माहिती आहे. दरम्यान, याआधी भाजप आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे, आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या कारला अपघात झाला. त्यानंतर आता बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे.

Tagged