जाटनांदूरच्या तरुणाचा सोलापुरात खून!

क्राईम न्यूज ऑफ द डे शिरूर


जाटनांदूर दि.29 : शिरुर तालुक्यातील जाटनांदूर येथील तरुणाचा सोलापूर जिल्ह्यातील विटोपीन कारखान्यावर खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.28) उघडकीस आली.


आकाश सोमीनाथ वाल्हेकर (वय २३) असे तरुणाचे नाव आहे. आकाश हा जामखेड येथे नर्सिंग कोर्स करत होता. त्याचे आई-वडील सोलापूर जिल्ह्यातील विटोपीन कारखान्याला ऊसतोडणीसाठी गेले होते. पंरतु काही कोयते गावाकडे पळून आल्यामुळे तो महीन्यापूर्वी कारखान्यावर ऊसतोडायला गेला होता. अचानक आजारी पडल्यामुळे त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्याचा भाऊ परत उसतोडणीसाठी आला. परत त्याला आणण्यासाठी रुग्णालयात गेल्यानंतर रुग्णालय बंद होते. तिथे विचारपूस कर्ली असता तो घरी गेल्याचे सांगितले. त्याचा शोध घेतला असता रात्री ६ वाजता याच परिसरात ज्वारीच्या शेतात मृतदेह आढळून आला. त्याचा खून केल्याचे प्रथमदर्शी दिसून आले. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. खून कुणी केला? का केला? याचा तपास पोलीस करत आहेत. त्याच्या पश्वात आई-वडील, दोन बहीण, एक भाऊ असा परिवार आहे.त्याच्या पार्थीवावर दजाटनांदूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Tagged