karuna dhananjay munde

करुणा शर्मांना जामीन मंजूर

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे परळी बीड

बीड दि.17 : न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांनी अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र काही कारणास्तव सुनावणी झाली नव्हती. मंगळवारी (दि.21) त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने त्यांना 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांवर जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून दाखल गुन्ह्यात करूणा शर्मा या 6 सप्टेंबरपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी वकिलांमार्फत अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. न्या. सुप्रिया सापतनेकर यांच्या न्यायालयासमोर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद झाले. यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने अशोक कुलकर्णी तर करुणा शर्मा यांच्या वतीने अ‍ॅड. भारजकर यांनी बाजू मांडली. करुणा शर्मा यांनी पुन्हा बीड जिल्ह्यात येऊन अशा प्रकारचा कृत्य करू नये अशी मागणी सरकारी वकिलांनी कोर्टासमोर ठेवली होती तर करुणा शर्मा यांना जाणीवपूर्वक खोट्या गुन्ह्यात गुंतवण्यात आल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. भारजकर यांनी केला अशी माहिती सूत्रांनी दिली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने यावर मंगळवारपर्यंत निकाल राखून ठेवला होता. मंगळवारी 25 हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. आता करुणा शर्मा पुढे काय पाऊच उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tagged