राष्ट्रवादी ओबीसी OBC सेलचे प्रदेशाध्यक्ष पद बीडच्या नेत्याकडे

न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil यांनी केली नियुक्ती

बीड : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या NCP महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय (ओबीसी) OBC विभाग अध्यक्षपदी बीडचे कल्याण आखाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कल्याण आखाडे हे ओबीसी नेते आहेत. ते सावता परिषदेचे संस्थापक आहेत. संघटनेच्या माध्यमातून त्यांचे राज्यभरात कार्यकर्त्यांचे जाळे आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेवरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे. नियुक्तीपत्रात म्हटले की, आपली महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय (ओबीसी) विभाग अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे. पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्व सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आपण कार्यरत राहाल असा मला विश्वास आहे. दरम्यान, आखाडे यांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

Tagged