पिग्मी एजंटचा खून!

बीड


बीड दि.22 : रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह रविवारी (दि.22) सकाळी परळीतील तहसील मैदानावर आढळून आला. मयत हा पिग्मी एजंट असून खुनाचे कारण व आरोपीची माहिती समोर आली नाही.

महादेव मुंडे (रा. भोपळा) असे मयताचे नाव आहे. ते पिग्मी एजंटचे काम करायचे. तहसील मैदानावर त्यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच परळी पोलीस व अंबाजोगाईचे उप विभागीय पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Tagged