शाळा का भरवली नाही म्हणून लिपिकास मारहाण

केज क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

 केज  :  ‘शाळा का भरवत नाहीत?’ असे म्हणत तालुक्यातील विडा येथे शाळेतील कनिष्ठ लिपिकास एकाने शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

बुधवारी (दि.29) दुपारी 4:30 वा. केज तालुक्यातील विडा येथील हनुमान विद्यालयातील कनिष्ठ लिपिक बापुराव रामराव देशमुख (45) हे कार्यालयीन कामकाज करीत होते. यावेळी साजन दगडु वाघमारे याने तुम्ही शाळा का भरवित नाहीत? असे म्हणत शिविगाळ करूण चापटा बुक्कयाने मारहाण केली. तसेच हातामध्ये दगड धरुन डाव्या कोपरावर मारुन मुक्का मार दिला, आणि तू नौकरी कशी करतोस? असे म्हणून शासकीय कामात अडथळा आणला. या प्रकरणी बापूराव देशमुख यांच्या फिर्यादीवरून साजन वाघमारे यांच्याविरोधात केज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे हे करीत आहेत.

Tagged