two wheeler ride

दुचाकीवर डबल सीटला मंजुरी

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड, दि.30 : राज्यात 31 ऑगस्ट 2020 रोजी पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवलेला आहे. त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातही हाच कालावधी लागू असेल अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली. नव्या आदेशानुसार आता दुचाकीवर दोघां जणांना हेल्मेट आणि मास्क सह प्रवास करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय तीनचाकी आणि चारचाकीतही प्रवाशी संख्या वाढविण्यात आली आहे.
काय म्हटले आहे आजच्या आदेशात

  • मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सस यांना चित्रपटगृह व्यतिरिक्त सकाळी 09.00 वा. ते सायंकाळी 7.00 वा पर्यंत कोवीड -19 विषयक सर्व नियमांचे पालन करणेचे अटीवर दिनांक 5 ऑगस्ट 2020 रोजी पासून चालू ठेवण्यास परवानगी असेल, तसेच मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्स मधील फूड कोर्ट/ रेस्टॉरंटस यांना फक्त घरपोच सेवा होम डिलेव्हरी साठी परवानगी असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांनी असे नगरपालिका, नगरपंचायती यांनी दिलेल्या दिशा निर्देशाचे पालन करणे बंधनकारक राहील.
  • कोविड -19 विषयक बंधने पाळून खुल्या जागा व्यायामासाठी या आधी अमलात असणार्‍या नियमाप्रमाणेच वापरता येतील.
  • कार्यालय तसेच शैक्षणिक संस्थांमधील कर्मचारी यांना अशैक्षणिक कामासाठी जसे उत्तरपत्रिका तपासणी /निकालपत्र घोषित करणे, संशोधन क्षेत्रातील वैज्ञानिक, ऑनलाइन शिक्षण विषयक कामे इत्यादी करता येतील व यासाठी संस्था उघडता येतील.
  • खुल्या जागा मध्ये सामूहिक क्रीडा व्यतिरिक्त खेळ जसे की जिम्नॅस्टिक, टेनिस, बॅडमिंटन व मल्लखांब यांना दिनांक 5 ऑगस्ट 2020 पासून कोविड-19 विषयक सर्व नियमांचे पालन करण्याची अटीवर परवानगी असेल. तसेच जलतरणिका चालू करणेस ही बंदी कायम राहील.
  • सर्व सार्वजनिक व खाजगी वाहतूक करणारे व्यक्तींनी गाडीतील एकूण प्रवाशांच्या संख्येत विषय खालील प्रमाणे व्यवस्थापन करावे.
  • दुचाकी:- 1 चालक+1 प्रवासी हेल्मेट व मास्कसह
  • तीनचाकी :- 1चालक + 2 प्रवासी सर्व व्यक्ती मास्कसह
    3.चारचाकी:- 1 चालक+3 प्रवासी सर्व व्यक्ती मास्कसह
Tagged