SONIA GANDHI

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

देश विदेश न्यूज ऑफ द डे

नवी दिल्ली, दि.30 : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना रुटीन चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अशी माहिती रुग्णालयाचे प्रमुख डॉ. डी. एस. राणा यांनी सांगितलं आहे. आज संध्याकाळी सात वाजता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एएनआयने या संबंधीचे वृत्त दिले आहे.

काही वेळापूर्वीच सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या राज्यसभा खासदारांसोबत बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे. तसंच या बैठकीत करोना, भारत-चीन यांच्यातले तणावपूर्ण संबंध, सध्याची राजकीय स्थिती या सगळ्या विषयांवर चर्चा झाली.

Tagged