बीड जिल्ह्यात पुन्हा कोरोना वाढला

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

२ तालुक्यात कोरोना शून्यावर

बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दरदिवशी कमी -जास्त होताना दिसून येत आहे. कालच्या तुलनेत आजचा (दि.२४) आकडा वाढला आहे. परंतू दोन तालुक्यात कोरोना शून्यावर आहे.

सोमवारी ३ हजार ७५४ जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.२४) प्राप्त झाले, त्यामध्ये ९२ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ३ हजार ६६२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात १३, अंबाजोगाई ५, आष्टी ३८, धारूर २, गेवराई ४, केज १३, माजलगाव, पाटोदा प्रत्येकी ५, शिरूर ७ रुग्णांचा समावेश आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.

Tagged