नारायण राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड; अनेक ठिकाणी निदर्शने

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड जिल्ह्यात शिवसेना, युवासेना आक्रमक

बीड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी अपशब्द वापरल्यानंतर बीड जिल्ह्यात शिवसेना आक्रमक झाली आहे. नारायण राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड काढत, पुतळ्याचे दहन करण्यात आले. तर नारायण राणेंसह त्यांच्या दोन मुलांना भेटतील तिथं कपडे काढून मारू. असा संतप्त इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

बीड, माजलगावसह, परळी अंबाजोगाई, केज यासह सर्व तालुक्यात शिवसेनेची निदर्शने झाली आहे. बीडमध्ये गाढवावरून धिंड काढत पुतळा दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला. तर परळी, माजलगाव, अंबाजोगाईत बॅनर जाळण्यात आले. त्याचबरोबर बीडसह परळीत नारायण राणेवर गुन्हा दाखल करावा म्हणून पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. दरम्यान नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास राणेंसह मुलांना राज्यभर फिरू देणार नाही. दिसतील तिथं कपडे काढून मारू आणि भविष्यात यापेक्षा तीव्र आंदोलन करू. असा संतप्त इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर, युवासेना जिल्हाप्रमुख सागर बहीर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या आदेशावरून राज्यभर नारायण राणे यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. राज्यातील सर्व पोलीस ठाण्यात राणेंविरुद्ध विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. युवासेना पदाधिकारी यांनी अनेक ठिकाणी तक्रारी दाखल केल्या आहेत.

―विपुल पिंगळे, राज्य विस्तारक, युवासेना
Tagged