narayan rane

नारायण राणेंना पोलीसांनी घेतलं ताब्यात

देश विदेश न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र राजकारण

संगमेश्वर : मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचं एक पथक कोकणाकडे रवाना झालं होतं. त्यानंतर नारायण राणे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर पोलिसांनी नारायण राणेंना ताब्यात घेतलं आहे.


दरम्यान राणेंकडून पोलीसांना अटक वॉरंटची मागणी करण्यात आली. मात्र पोलीसांनी अशा प्रकारचं अद्याप वॉरंट दाखविलेलं नाही. त्यामुळे गेल्या अर्धातासापासून राणे आणि पोलीस संगमेश्वर येथे एका खोलीत बसून आहेत. बाहेर कार्यकर्ते आणि पोलीस देखील मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत.


याबाबत बोलताना राणे यांच्या वकील म्हणाले पोलीसांवर दबाव आहे. पोलीसांकडे साधे अटक वॉरंट नाही. एका केंद्रीय मंत्र्याना अटक करायला जाताना पोलीसांकडे साधे अटक वॉरंट असू नये का असा सवालही प्रमोद जठार यांनी केला. मंत्री राणे यांनी असा काय मोठा गुन्हा केलाय? की त्यांना अटक करायची आहे. हे कायद्याचे राज्य आहे. आम्ही आता हायकोर्टात धाव घेतली आहे.


दरम्यान राणेंची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचं एक पथक या ठिकाणी दाखल झाले आहे. त्याचा ब्लडप्रेशर आणि शुगर वाढल्याचे सांगितले जाते. परंतु आता राणे यांच्या अटकेची पूर्ण तयारी महाराष्ट्र शासनाकडून झालेली दिसत आहे.

पोलीस फोर्स वापरून अटक करा
दरम्यान राणे यांच्याकडून अटक वॉरंटची मागणी केल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना फोन केला. त्यावेळभ परब यांनी पोलीस फोर्स वापरून त्यांना अटक करा, असे सांगितले. सदरील आदेशाची व्हिडिओ रेकॉर्डिंग समोर आले आहे.

Tagged