suspend

अंबाजोगाईचे तत्कालीन तलाठी, मंडळअधिकारी निलंबित

अंबाजोगाई न्यूज ऑफ द डे

बीड : अंबाजोगाई येथील तलाठी सज्जा हा सतत वादाच्या भोवर्‍यात असतो. येथील सज्जाचे तत्कालीन तलाठी TALATHI आणि मंडळअधिकारी MANDAL ADHIKARI यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश उपविभागीय अधिकारी शोभादेवी जाधव SDO SHOBHADEVI JADHAV यांनी सोमवारी दिले आहेत.

सचिन केंद्रे असे तत्कालीन तलाठ्याचे तर आर.बी.कुमठकर असे मंडळ अधिकार्‍यांचे नाव आहे. हे दोघे अंबाजोगाई सज्जावर कार्यरत असताना त्यांनी फेरफारमध्ये प्रचंड अनियमितता केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तलाठी सचिन केंद्रे यांच्याकडे धानोरा खुर्द सज्जावर कार्यरत असताना अंबाजोगाई सज्जाचा अतिरिक्त पदभार होता. त्यांच्या कार्यकाळातील फेरफारबाबत तक्रारी COMPLAINS प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यांचा खुलासा उपविभागीय अधिकारी यांनी अमान्य करत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यांच्यावर शासकीय जमीनींची नियमबाह्य विल्हेवाट लावणे, नियमबाह्य क्षेत्रांच्या नोंदी बदलणे, भोगवटदारांचे वर्ग 2 चा 1 करणे, क्षेत्र कमी करणे, अधिकारक्षेत्राच्या बाहेर जाऊन 7/12 देणे, 7/12 वरील नोंदी बदलणे, अनावश्यक पोटहिस्से तयार करणे, अभिलेखामध्ये खाडाखोड करणे असे गंभीर प्रकार तलाठी सचिन केंद्रे यांनी बेकायदेशीपणे केल्याचे आदेशात नमूद आहे. त्यांना निलंबन काळात तहसील कार्यालय, केज हे मुख्यालय देण्यात आले आहे.

मंडळ अधिकारी आर.बी.कुमठकर हे अंबाजोगाई मंडळासाठी 18 जुलै 2018 पासून कार्यरत आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक मंजूर फेरफारमध्ये व अधिकार अभिलेखात नियमबाह्य बदल झाले आहेत. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. परंतु त्यांनी निलंबित तलाठी केंद्रे यांच्या खुलाश्यामधील मजकूर जशास तसा मांडला आहे. त्यांचा खुलासा गांभीर्यपुर्वक नसल्याचे नमूद करत त्यांना देखील निलंबित करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. त्यांच्यावर संगणकीय प्रणालीवर पूर्वावलोकन करुनही चुकीच्या पद्धतीने नोंदी मंजूर करणे, खातेदारांचे म्हणणे न ऐकता क्षेत्र कमी जास्त करणे, चुकीच्या पद्धतीने फेरफार मंजूर करणे, न्यायालयीन निर्णयांचा चुकीचा अर्थ लावून अधिकार अभिलेखामध्ये चुकीच्या नोंदी करुन विवादास्पद परिस्थिती निर्माण करणे आदी गंभीर स्वरुपाचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून निलंबन केले आहे. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय तहसील कार्यालय, केज हे मुख्यालय देण्यात आले आहे.

Tagged