पोलीस, पत्रकारास कोरोनाची लागण

आष्टी कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यात काल (दि.11) एकाच दिवशी कोरोनाचे सर्वाधिक 20 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली. यात एका पत्रकारासह पोलिसाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

आष्टी येथील दत्तमंदीर गल्ली येथील एका 44 वर्षीय पत्रकारासह पाटोदा तालुक्यातील अंमळनेर ठाण्यात कार्यरत असलेल्या 50 वर्षीय पोलीस कर्मचार्‍याचा रुग्णामध्ये समावेश आहे. ते बीड येथील संत तुकाराम नगर येथे वास्तव्यास आहेत. ते पोलीस बंदोबस्तात कर्तव्यावर होते. दरम्यान, बाधित पोलीस, पत्रकार वास्तव्यास असलेला भाग कंटेनमेंट झोन घोषित करुन संपर्कातील लोकांचा प्रशासनाकडून शोध सुरु झाला आहे.

(बातमीतील फोटो प्रतिकात्मक आहे.)