death

परळीच्या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू

परळी बीड

बीड : उपचारासाठी औरंगाबादला गेल्यावर परळी शहरातील आजाराने ग्रासलेल्या एका 57 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मयत व्यक्तींचा आकडा 3 असून अद्याप केजच्या महिलेची नोंद जिल्हा आरोग्य विभागाकडे घेण्यात आलेले नाही.

परळी शहरातील एक महिला किडनीचा आजार असल्याने उपचारासाठी औरंगाबादला गेल्यावर 5 जून रोजी कोरोना पॉझिटिव्ह आली होती. तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. तिला किडनीच्या आजारासह मधूमेह, हायपरटेंशन, न्यूमोनिया हे आजारही होते. बुधवारी तिला रुग्णालयातून सुटीही देण्यात येणार होती. परंतू डायलेसीस करायचे असल्याने ठेवण्यात आले होते. गुरूवारी पहाटे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, आतापर्यंत मुळेच अहमदनगर जिल्ह्यातील परंतू आष्टी तालुक्यातील पाटण येथे नातेवाईकांकडे आलेली 65 वर्षीय वृद्ध महिला, मातावळी येथील 35 वर्षीय व्यक्ती, केज तालुक्यातील माळेगाव येथील 60 वर्षीय महिला आणि आता परळीच्या महिलेचा समावेश आहे. केजच्या महिलेची अद्याप बीड जिल्हा आरोग्य विभागाकडे नोंद नाही.

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged