suicide

आईला, बहिणीला अन मुलीला सांभाळा असं अंगावर लिहून केली आत्महत्या

क्राईम बीड


बीड : माझ्या आईला, बहिणीला अन मुलीला सांभाळा असं अंगावर लिहून एका तरुणाने आत्महत्या केली. ही घटना बीड तालुक्यातील कामखेडा येथे गुरुवारी (दि.18) सकाळी उघडकीस आली.
अनिल अशोक जमदाडे ( वय 32 रा.कामखेडा ता.बीड) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने घरातच छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्याने अंगावर आईला, बहिणीला अन मुलीला सांभाळा असं पेनाने लिहल्याचे दिसून आले. आत्महत्या कशामुळे केली हे मात्र समजू शकले नाही. त्यांना दोन मुली आहेत. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोउपनि. सुरेश माळी, पोह रमेश दुबाले यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tagged