आठ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार!

बीड

बीडमधील घटना; आरोपी पोलीस कोठडीत
बीड
दि.12 : येथील शासकिय बालगृहातील एका आठ वर्षीय चिमुकल्यावर येथीलच कनिष्ठ लिपिकाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घृणास्पद घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल असून आरोपी पोलीस कोठडीत आहे.

सतीश महाडिक (वय 56 रा.अंकुशनगर, बीड) असे नराधमाचे नाव आहे. बीड येथील शासकिय बालगृहात महाडिक हा कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. बालगृहात काळजी संरक्षणाचे आठ वर्षीय चिमुकला होता. माडिकने त्यास स्वतःच्या घरी नेवून त्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. या प्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, गुन्हा दाखल होताच पिंक पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक अतुलकुमार लांडगे, पोह.विकास उजगरे यांनी आरोपीस अटक केली. त्यास न्यायालयासमोर हजर केले असता 13 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Tagged