crime

नेकनूर पाठोपाठ अंबाजोगाईतही खून

क्राईम

घाटनांदूर : अंबाजोगाई तालुक्यातील खापरटोन येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात शनिवारी (दि.6) सकाळी तरुणाचा मृतदेह आढळून आला. सदरील तरुणाचा रात्री उशीरा दगडाने ठेचून खून केल्याची माहिती पोलीसांनी दिली.

ज्ञानोबा सोपान मुसळे (वय 38 रा.खापरटोन ता.अंबाजोगाई) असे मयताचे नाव आहे. शनिवारी सकाळी खापरटोन येथील शाळेजवळ पाण्याच्या टाकीच्या बाजूला ज्ञानोबा मृतदेह यांचा मृतदेह आढळून आला. रात्रीतून कधीतरी हा खून झाला असावा आणि दुसरीकडे खून करून मृतदेह पाण्याच्या टाकीच्या बाजूला आणून टाकला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. हा खून कोणी आणि कोणत्या कारणास्तव केला. हे अद्याप निष्पन्न झालेले नाही. या प्रकरणी बर्दापूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदानासाठी घाटनांदूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाठवण्यात आला होता. तिथून मृतदेह अंबाजोगाई स्वाराती रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.