जुन्या क्रिकेट सामन्यांचे पुनःप्रक्षेपण

खेळ

बीड : कोरोनाच्या सावटामुळे आयपीएल रद्द करावे लागले. त्यामुळे हिरमोड झालेल्या देशभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे.
आयपीएलवर आता अनिश्चिततेचं सावट आहे. त्यामुळे सर्वांना घरीच रहावं लागत आहे. अशात क्रिकेट चाहत्यांना आता जुने 2000 च्या दशकातील सामने पुनःप्रक्षेपण येणार आहेत. याबाबतचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. उद्यापासून (दि.7) 14 एप्रिलपर्यंत हे सामने डीडी स्पोर्टवर दाखवण्यात येणार आहेत. यात आजपर्यंतचे वर्ल्डकप दाखवण्यात येत आहेत.